Mumbai News : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 वाजता जनतेशी साधणार संवाद

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा धोका (corona), मेट्रो कारशेड (Metro car shed) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर विरोधकांकडून होणारे आरोप यासर्वाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.

एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. अशात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात पेटून उठले आहेत. त्यामुळे या सगळ्यावरून काही मोठा निर्णय घेतला जाणार आहे का हे पाहणं आता जनतेसाठी महत्त्वाचं असणार आहे.  

 खरंतर, राज्यात कोरोनाची लाट अद्यापही कायम आहे. नियम जरी शिथील केले असले तरी जीवघेण्या संसर्गाचा धोका आणखी वाढत आहे. अशात आता रेल्वे सुरू होण्यावर भर देण्यात येत असल्यामुळे भविष्यात होणारी गर्दी कशी टाळता येईल. इतकंच नाही तर कोरोनाच्या लसींसदर्भात सरकारचं काम कुठपर्यंत आलं आहे. यावरही मुख्यमंत्री महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.