Chikhali : कॉनक्वेस्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत भरारी


एमपीसी न्यूज – चिखलीतील महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेच्या कॉनक्वेस्ट महाविद्यालयाची विद्यार्थीनी स्नेहल आचार्य हिने कंपाउंड राऊंड 50 मीटर आर्चेरी (धनुर्विद्या) या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम तर विभागात चौथा क्रमांक पटकावला. या स्पर्धेच्या यशामुळे तिची ऑल इंडिया नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्नेहलच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, संचालिका प्रा. नेहा बोकील व प्राचार्य प्रदीप कदम यांनी तिचे अभिनंदन केले. तिचे हे यश चिखली परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

सायकलिंगमध्ये सुर्या तातू, कायकींगमध्ये सुदर्शन गावडे व निलेश बारणे यांनी विद्यापीठ स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. पॉवर लिफ्टिंगमध्ये ओमकार खेडकर व प्रणव पोटे यांची पंजाब येथे होणा-या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रायफल शुटिंगमध्ये प्रथमेश सुर्यवंशी आणि कुस्ती मध्ये विपुल वाळुंज या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

महाविद्यालयातील विराज परदेशी व अजिंक्य बलकवडे या विद्यार्थ्यानी किरगिझस्तान येथे झालेल्या स्पर्धेत भारताला पेंन्टँथलॉनमध्ये कांस्य पदक मिळवून दिले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाविद्यालयातील प्रा. चिंतामन शिंदे, प्रा. स्मिता वैराट, प्रा. मंगेश किनगे, प्रा. नयना सरोदे, प्रा. दयानंद ओव्हाळ, प्रा. संतोष शिंदे, प्रा. अनिता जाधव, प्रा. ज्योती तळेगावकर- बिरवाडकर आदी क्रीडा विभागाच्या शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रा. सारिका भोसले, प्रा. धनश्री भारंबे, प्रा. योगेश आत्तरकर, प्रा. अमोल कवडे, प्रा. वैभव पताळे, प्रा. पुष्पा उदमले प्रा. रेखांजली गाडेकर, प्रा. पल्लवी धांडे, प्रा. मेघा इंगळे आदिंनी या विद्यार्थ्यांच्या यशासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.