Chikhali: आयटी कंपनीतील युवकाने सुरु केले कडधान्यांचे दुकान

Chikhali: A young man from an IT company started a cereal shop

एमपीसी न्यूज – सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामध्ये लॉकडाउन सुद्धा सुरु आहे आणि अशात लोकांच्या नोकरी, व्यावसाय संकटात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनवा या केलेल्या आवाहनाला  प्रतिसाद देत पूर्णानगर मधील आयटी कंपनीत मध्ये कार्यरत असलेले  श्रीकृष्ण काशीद यांनी पूर्णानगर मध्ये स्वतःचे कडधान्याचे दुकान सुरु केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक विलास लांडगे  यांच्या हस्ते या दुकानाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले.

बार्शीची ज्वारी, गहू तसेच हरभरा, मूग, मटकी असे कडधान्य दुकानात असणार आहे. या कोरोनाच्या महामारीच्या काळात एकीकडे तरुण वर्ग हतबल झालेला असताना श्रीकृष्ण याने या संकटाला एक संधी म्हणून पहिले आहे. तरुण वर्गांनीही या संधीचा फायदा उठून आत्मनिर्भरतेचा मंत्र घेऊन स्वतः व्यवसायात यावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी नगरसेवक एकनाथ पवार, नगरसेविका योगिता नागरगोजे, संघचालक नरेश गुप्ता,  श्रीराम कुलकर्णी, शैलेश कुलकर्णी, उमेश कुटे, दिनेशजी फुलदेवरे, निशांत बोरसे, मंगेश पाटील आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.