Pune : महापालिकेच्या अनावश्यक कामांना कात्री लागणार; आयुक्तांचे संकेत

Unnecessary work of the corporation will have to be cut; Indications of the Commissioner

एमपीसी न्यूज – कोरोनाचा फटका पुणे महापालिकेलाही बसला आहे. कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात अनावश्यक कामांना कात्री लावण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले.

महापालिकेचा वीजबिल भरणा जलसंपदाला पाण्याचे बिल आणि सफाई कामाचे बिल मात्र द्यावेच लागणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ड्रेनेज, गार्डन, फुटपाथ दुरुस्ती कामांवर होणारा खर्च टाळण्यात येणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020 – 21 चे 7 हजार 390 कोटींचे बजेट सादर केले आहे. त्यामध्ये नगरसेवकांच्या ‘स’ यादीलाही कात्री लागणार आहे. ही कामे साधारण डिसेंबर महिन्यापासून सुरू होतात.

कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मिळकतकर, बांधकाम, जीएसटीचेही उत्पन्न कमी झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतर्फे शहरातील विविध भागात कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत.

त्या ठिकाणी 72 हजार जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले आहे.

सध्या शहरात 4 हजार 500 आणखी बेडस शिल्लक आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.

दरम्यान, पुणे शहरात आता कोरोनाचे साडे आठ हजारांच्या पुढे रुग्ण गेले आहेत. तर, 413 नागरिकांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे सर्वच अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.