Chikhali : दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – दिवाळीच्या खरेदीसाठी येणाऱ्या महिलांच्या (Chikhali) गळ्यातील दागिने चोरणाऱ्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. बाजारात, गर्दीच्या ठिकाणी चिखली पोलिसांनी पाळत ठेऊन ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या चोरट्याने दागिने हिसकावण्याचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

Railway : तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या 317 जणांना अटक

रोहित दशरथ गावडे (वय 23, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. लासुर्णे जंक्शन, ता. इंदापूर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाची धामधूम असल्याने महिला व नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात.

बाजाराच्या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावतात. यासाठी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांनी बाजारात, गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात गस्त घालण्याच्या सूचना दिल्या होत्या.

माहेरवाशीणीचे मंगळसूत्र हिसकावले

रुचिता गौरव महाजन (वय 24) या जळगाव येथून चिखली येथे माहेरी दिवाळीच्या (Chikhali) सणासाठी आल्या होत्या. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता त्या खरेदीसाठी जात होत्या.

त्यावेळी जाधववाडी येथील राजे शिवाजीनगर येथे एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. त्यानंतर चोर पळून गेला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  अशाच प्रकारची घटना 26 ऑक्टोबर रोजी देखील रामायण मैदान, जाधववाडी, चिखली येथे घडली होती.

चिखली पोलिसांनी लावला ट्रॅप

दोन्ही गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर जाधववाडी येथील बाजारात हा आरोपी पुन्हा चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी बाजार परिसरात ट्रॅप लावला. आरोपी हा सावज शोधत बाजारात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वरील दोन गुन्हे केल्याचे कबूल केले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद, पोलीस अंमलदार बाबा गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, भास्कर तरळकर, दीपक मोहिते, संदिप मासाळ, गौतम सातपुते, अमोल साकोरे, विश्वास नाणेकर, कबीर पिंजारी, राठोड, संतोष सपकाळ, नाईक यांनी (Chikhali) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.