Chikhali Crime News : सोसायटीत टोळक्याची दहशत, गाड्या फोडल्या, लोकांना धमकावले

एमपीसी न्यूज – पाच जणांच्या टोळक्याने सोसायटीच्या पार्किंगमध्ये घुसून दहशत निर्माण केली. पार्किंगमधील गाड्या फोडल्या तसेच लोकांना धमकावले. निसर्ग सोसायटी, घरकुल, चिखली याठिकाणी शनिवारी (दि.29) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

अतुल निसर्गंध व महेश चंदनशिवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ बालाजी गायकवाड (वय 28, रा. निसर्ग सोसायटी, घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोसायटीत घुसून पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड केली. विरोध करण्यासाठी लोक खाली येत असताना त्यांच्यावर सिमेंटचे गठ्ठे फेकून मारले. तसेच, लोकांना शिवीगाळ केली व आमच्या नादी लागाल तर मारुन टाकू अशी धमकी दिली व त्याठिकाणाहून पळ काढला. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.