Chikhali Crime News : गुटखा विक्री प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज – टपरी चालकाला गुटखा विकत असताना गुन्हे शाखेने तिघांना पकडले. त्यांच्याकडून 73 हजार 85 रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 6) सकाळी जाधववाडी, चिखली येथे करण्यात आली.

महेंद्र आत्माराम देवासी (वय 23, रा.हरगुडे वस्ती, चिखली), प्रकाश ओगडरामजी देवासी (वय 19, रा. हरगुडेवस्ती, चिखली), अंबादास धर्मा राठोड (वय 50, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. हिंगोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार महादेव जावळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंबादास याची जाधववाडी येथे टपरी आहे. आरोपी महेंद्र आणि प्रकाश हे अंबादास यालाटपरी वर येऊन गुटखा विकत होते. त्यावेळी गुन्हे शाखेने छापा मारून कारवाई केली. तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विमल पान मसाला आणि तंबाखूचे पोते असा एकूण 73 हजार 85 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.