MHT CET : CET परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षेला सुरुवात

एमपीसी न्यूज – व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी एमएचटी परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत एमएचटी सीईटी परीक्षेच्या तारखांसदर्भात माहिती दिली.

व्यावसायिक अभ्यासक्रमांची एमएचटी सीईटी परीक्षा15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर कालावधीत होणार आहे 20 ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर केले जातील, असंही ते म्हणाले. याशिवाय यंदा सीईटी परीक्षा देणाऱ्याच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 10 हजारांनी वाढ झाली आहे. सीईटी परीक्षा झाल्यावर 1 नोव्हेंबर पासून कॉलेज सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याच उदय सामंत यांनी सांगितलं.

सामाईक प्रवेश परीक्षांना उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाकडून लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तपशीलवार वेळापत्रक पाहण्यासाठी राज्य सीईटी कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर भेट द्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.