Chikhali : नाल्याजवळच्या 11 अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागाने चिखली आकुर्डी रस्ता नाल्याजवळच्या गट नं 891 येथील 11अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर (क्षेत्रफळ अंदाजे 5645 चौरस फुटावर ) कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मधील मौजे चिखली जाधववाडी येथे अनधिकृत बांधकामे केली आहेत. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागातर्फे चिखली आकुर्डी रस्ता नाल्याजवळच्या 11 अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात गुरुवारी (दि.27) ही कारवाई करण्यात आली आहे.

दोन उपअभियंता, दोन कनिष्ठ अभियंता व नऊ बीट निरीक्षक यांच्यापथकाने अतिक्रमण पथकातील पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, स्थानिक पोलीस कर्मचारी, एक जेसीबी, महापालिका मजुरांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like