Chikhali: जागतिक योग दिनानिमित्त एवरेस्ट प्लाझा सोसायटीत औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

Chikhali: Medicinal plantation at Everest Plaza Society on the occasion of World Yoga Day कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत हे वृक्षारोपण करण्यात आले.

एमपीसी न्यूज- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून चिखली येथील एवरेस्ट प्लाझा सोसायटीतील नागरिकांनी औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण माजी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी एवरेस्ट प्लाझा सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सोसायटीतील नागरिकांनी एकत्र येऊन आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या कडूलिंब या वनस्पतीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

सोसायटीतील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत हे वृक्षारोपण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.