Chikhali News: सोनवणे वस्तीमधील अनधिकृत बांधकामावर मोठी कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत चिखली, सोनवणे वस्ती गट नं. 1325 मधील अनधिकृत आरसीसी इमारत, इंडस्ट्रीयल पत्राशेडवर आज (बुधवारी) कारवाई करण्यात आली. अंदाजे 45156 चौरस फुट क्षेत्राफळावर कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात आहे. दररोज शहराच्या विविध भागात कारवाईचा धडाका सुरु आहे. पत्राशेड, बांधकामे भुईसपाट केली जात आहेत. फ क्षेत्रिय कार्यालय प्रभाग क्रमांक 1 चिखली, सोनवणे वस्ती गट नं. 1325 मधील अनधिकृत आरसीसी इमारत व इंडस्ट्रीयल पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

सह शहर अभियंता मकरंद निकम तसेच कार्यकारी अभियंता, संजय घुबे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुधीर मोरे, उप अभियंता सुर्यकांत मोहिते, कनिष्ठ अभियंता विश्वनाथ राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 19, क, ई व फ क्षेत्रिय कार्यालयाचे अतिक्रमण पथक, अतिक्रमण विभागाचे 10 पोलीस कर्मचारी, चिखली पोलीस स्टेशनचे पी. एस. आय, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाचे सुरक्षारक्षक 85 वैद्यकिय विभागाची रुग्णवाहिका, विद्युत विभागाचे कर्मचारी, मजूर, जेसीबी, पोकलेन, जॉकटरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a5ff723cd5027b',t:'MTcxNDEyODQ4MS4zODAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();