_MPC_DIR_MPU_III

Chikhali News: कृष्णानगर, पूर्णानगरमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 कृष्णानगर, पूर्णानगर, घरकुल वसाहत या भागातील विविध विकासकामांचे आमदार महेश लांडगे आणि माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते आज (गुरुवारी) भूमिपूजन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

जिजामाता पार्क व फुलेनगर येथील रस्त्याचे डांबरीकरण, प्रथमेश पार्क, सिद्धी पार्क सोसायटी कृष्णानगर परिसरात नवीन रंगीत पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. अजंठानगर परिसरातील रस्ते डांबरीकरण, दुर्गानगर ते त्रिवेणीनगर रस्त्याच्या बाजूने रंगीत पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे कामाला सुरुवात केली आहे. तसेच शिवतेजनगर येथील हनुमान मंदिराजवळील सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत. कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे एकनाथ पवार यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक संजय नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी नगरसेवक भीमा बोबडे, संतोष ठाकूर, अजय पाताडे, संदीप मांगावडे, अनिकेत बाबर, उद्धव शेळके, राजू वायसे, नाना वारे यांच्यासह नागरिक व अधिकारी उपास्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.