Chikhali Power cut: चिखली येथील विद्युत पुरवठा सकाळपासून खंडित, हजारो नागरिकांना त्रास

एमपीसी न्यूज: चिखली मधील नेवाळे वस्ती व जाधववाडी भागात (Chikhali News) आज सकाळी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

 

सकाळी सोसायटी जवळील ट्रान्सफॉर्मरचा मोठा आवाज झाला व 4.30 वा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे सोसायटीला फ्लॅट्स ला पाणीपुरवठा करण्यात आला नाही. विद्युत पुरवठा नसल्याने लोकांच्या दैनंदिन कामनावर प्रभाव पडला. जाधववाडी मधील आमच्या सोसायटीमध्ये 250 फ्लॅट्स आहेत. असं “श्रीप्रसाद राऊल, सचिव, देवराई हौसिंग सोसायटी यांनी सांगितल.

 

कपिल भदाणे, सचिव, शुभारंभ हौसिंग सोसायटी म्हणाले की, “विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आम्हाला डिझेल जेनरेटर चा वापर करावा लागतो. काल आम्हाला 10,000 रुपये डिझेल वर खर्च करावा लागला. आज सकाळी 6.10 वा विद्युत पुरवठा खंडित झाला व 7.45 वा सुरळीत झाला.”

Kidnapping Case: आर्थिक व्यवहारातून अपहरण करून मारहाण

संतोष कारले, खजिनदार, शुभारंभ हौसिंग सोसायटी म्हणाले की, “आमच्या सोसायटी मध्ये 186 फ्लॅट्स आहेत. आमच्या व इतर सोसायटी मध्ये राहणारे  रहिवासी जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांना विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर त्रास होतो कारण याचा परिणाम वाय -फाय सुविधेवर होतो.”

 

संजीवन सांगळे, चेअरमन, चिखली मोशी हौसिंग फेडरेशन म्हणाले की, “चिखली मधील नेवाळे वस्ती भागातील 4 ते 5 हौसिंग सोसायटींचा विद्युत पुरवठा आज साखळी खंडित झाला होता. त्यामुळे त्यामध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला.”

तळवडे भागात देखील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तळवडे भागात अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे तेथील कर्माचाऱ्यांना विजेअभावी बसून राहावे लागत आहे. सकाळच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना याचा त्रास भोगावा लागला आहे, तसेच दुपारच्या शिफ्टमधील लोकांचेही काम रखडले आहे. विद्युत खंडित होण्याच्या प्रकारात तळवडे येथे वाढ झाल्याने त्याचा स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर मोठा परिणाम होत असताना दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.