chikhali – चिखली येथे अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चिखली येथे अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला (chikhali)आहे. ही घटना शनिवार दि. 4 नोव्हेंबर सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार चिखली येथे अज्ञात वाहनाने पादचारी वृध्द व्यक्तीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Pune : अस्मी ‘ कथक नृत्य कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

त्यानंतर वृध्द व्यक्तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच वृद्धाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून चिखली पोलीस याबाबत तपास करत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.