Chikhali : चिखलीत बंगल्याच्या जिन्याचा दरवाजा तोडून केली चोरी

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील कृष्णानगर (Chikhali) येथे बंगल्याच्या जिन्याचा दरवाजा तोडून घरातून 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजताच्या कालावधीत घडली.

अनिकेत एकनाथ पाचर्णे (वय 35, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट पाहण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या (Chikhali) बंगल्याच्या जिन्याच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञातांनी बंगल्यात प्रवेश केला. लाकडी कपाटातील 63 हजार 700 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि टायटन कंपनीचे घड्याळ चोरट्यांनी चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.