Chikhli Crime : पूर्ववैमनस्यातून तरुणाला दगडाने मारहाण; दोन भावांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात दोन भावांनी मिळून शेजारी राहणा-या तरुणाला दगडाने माहराण केली. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री मोरे वस्ती, चिखली येथे घडली.

सुनील इब्राहिम पूर (वय 24) आणि सचिन इब्राहित पूर (वय 25, दोघेही रा. सिंहगड कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भावांची नावे आहेत. राजू यशवंत कांबळे (वय 27) यांनी याबाबत बुधवारी (दि. 18) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे आणि आरोपींमध्ये दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी टॉयलेटसाठी बाहेर आले असताना आरोपींनी पुन्हा त्यांच्याशी भांडण उकरून काढले. “तू आमच्या नादी लागू नकोस, नाहीतर तुला मारून टाकेल’, अशी धमकी आरोपींनी कांबळे यांना दिली. तसेच दगडाने मारहाण करीत जखमी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.