Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दंगल काबू पथकातील 35 पेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांची बदली

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी जय्यत ( Chinchwad) तयारी केली आहे. आयुक्तालयात असलेल्या दंगल काबू पथकातही नुकतेच फेरबदल करण्यात आले आहेत. पथकातील 35 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांची बदली करून त्यांच्या रिक्त जागी शारीरिक दृष्ट्या तरुण असलेल्या पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण पाच दंगल काबू पथक कार्यरत आहेत. त्यापैकी तीन पथक दिवसपाळी आणि रात्रपाळी करीता कार्यरत आहेत. तसेच, उर्वरित दोन पथक फक्त दिवसपाळी करीता कार्यरत आहेत. दरम्यान, पथकातील ज्या पोलीस अंमलदार यांचा कालावधी दोन वर्षापेक्षा जास्त झाला आहे. तसेच ज्यांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा पोलीस अंमलदारांची बदली करण्यात आली आहे.

Today’s Horoscope 24 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पथक क्रमांक 1 ते 3 मध्ये प्रत्येकी 20 पुरुष पोलीस अंमलदार आणि 5 महीला पोलीस अंमलदार यांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच, पथक क्रमांक 4 आणि 5 मध्ये प्रत्येकी 15 पुरुष अंमलदार आणि 5 महीला पोलीस अंमलदार यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. सर्व पथकामध्ये एक पोलीस हवालदार दर्जाचे पोलीस इंचार्ज म्हणून नेमण्यात आले आहेत.

या सर्व पथकांची रंगीत तालीम सुरू आहे. तसेच, पथकातील सर्व पोलिसांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील गोपनीय यंत्रणांना देखील अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, गोपनीय कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार माहिती संकलित करताना दिसत आहेत. शहारत येणाऱ्या व्हीआयपीच्या गर्दीमध्ये देखील पोलीस अंमलदार कार्यकर्ता ( Chinchwad) बनून वावरत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.