Chinchwad News : चिंचवड मध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत दिल्या पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा

एमपीसी न्यूज : चिंचवड मध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत पवना नदी व पर्यावरण संवर्धनाचा फलक हाती घेत घोषणा दिल्या. 13 व्या पवनामाई जलमैत्री अभियाना अंतर्गत ही मानवी साखळी करण्यात आली.शहरातील विविध शाळांमधील तब्बल 1200 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

मानवी साखळी आज दुपारी 3 वा चिंचवड मध्ये तयार करण्यात आली. त्याची सुरुवात चिंचवडगावातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजाऊ पर्यटन केंद्राच्या प्रवेश द्वारा समोरून तर त्याचे शेवटचे टोक अंबिका चौक, माणिक कॉलनी, लिंक रोड, चिंचवड येथे होते. ही मानवी साखळी 1.2 ते 1.5 किलोमीटर लांब होती. यामध्ये 11 शाळांचे सुमारे 1,200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 

Pune News : लॉयला, विद्या व्हॅली, विद्याभवन उपांत्य फेरीत दाखल

व्ही. के. माटे विद्यालय चिंचवड, रसिकलाल एम धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिंचवड, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे प्रेरणा माध्यमिक विद्यालय निगडी, समर्थ माध्यमिक विद्यालय- चिंचवड, मॉडर्न हायस्कूल व जुनिअर कॉलेज निगडी, पी ई एस मॉडर्न हायस्कूल निगडी, (Chinchwad News) डी आय सी इंग्लिश मीडियम स्कूल आकुर्डी, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय प्राधिकरण, आय आय सी एम आर कॉलेज आकुर्डी, जे एस पी एम,- राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ताथवडे या शाळांचे विद्यार्थी या मानवी साखळीत सहभागी झाले होते. त्यांच प्रमाणे शिक्षक वर्गही यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थी त्यांच्या शालेय गणवेशात आले होते. त्यांच्या हातात पवना नदी व पर्यावरण संवर्धनाचे संदेश असणारे फलक होते. तसेच त्यांनी पवना नदी व पर्यावरण संवर्धनासाठीच्या घोषणा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.