BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : खराळवाडीतील महाआरोग्य शिबिराचा 162 जणांना लाभ

161
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान, धर्मजागरण विभागाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त खराळवाडी येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा 162 जणांनी लाभ घेतला.

खराळवाडी येथे झालेल्या या शिबिराचे उदघाटन धर्मजागरण समितीचे संयोजक योगेश सासवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिध्दांत चव्हाण, राजकुमार जाधव, डॉ. सचिन रोहानी. डॉ. जयदिप मोरे, डॉ. रवींद्र चबिले, डॉ. सचिन बाहुकेर, डॉ. सागर उगाळे, डॉ. संकेत, डॉ. प्राजक्ता पखाले, डॉ. नितीन गावंडे, राजू शिंगाडे,बाळासाहेब धोत्रे, उद्योजक संजय जाधव आदी उपस्थित होते.

सुमीत वाघमारे, अरविंद कलापुरे, विनीत वाघमारे, सोमेश चव्हाण, गणेश कलापुरे, रुपेश आलगुडे, संदीप जादव, सौरभ चव्हाण, भूषण बोरसे, प्रदीप कलापुरे, संदीप जाधव, राजीव कुलकर्णी, निरंजन साळुंके, योगेश कोळंबेकर, अॅड. अविनाश बवले आदी कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.