Chinchwad: वाल्हेकरवाडीत पिंपळाच्या पाराखाली सुरू आहे मोफत दवाखाना

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे शहरातील बहुतांश दवाखाने बंद असताना भारतीय जैन संघटना व माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड वाल्हेकरवाडी येथे पिंपळाचे झाडाखाली मोफत दवाखाना सुरू केला आहे. या ठिकाणी दररोज किमान एक हजार नागरिकांना तपासून  मोफत उपचार व औषधे सुद्धा मोफत दिली जात आहेत.

या ठिकाणी सर्दी, खोकल्यासारख्या किरकोळ आजारावर तपासणी करून औषध उपचार केले जातात, तसेच करोनाबाबत कोणत्याही प्रकारचं संशय आल्यास त्याला निर्देशित रुग्णालयात जाण्याविषयी सांगितले जाते.

माजी उपमहापौर सचिन चिंचवडे म्हणाले की, फिजिकल डिस्टन्सिंगचे भान राखून ही सेवा पूर्णपणे मोफत दिली जात आहे, सध्याच्या स्थितीमध्ये नागरिक दवाखान्यात जाण्यास घाबरतात, त्यामुळे मोकळ्या वातावरणात सुरू केलेल्या या रुग्णसेवेचा नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. त्यासाठी दोन डॉक्टर व दोन सहकारी, शरीराचे तापमान मोजण्यासाठी एक सहाय्यक यांची नियुक्ती केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.