Walhekarwadi : उघड्या दरवाजावाटे तीन मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात (Walhekarwadi )चोरट्याने तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 17) सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी येथे घडली.

ओंकार मोहन अनंतपुर (वय 27, रा. गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी) (Walhekarwadi )यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : बैलाचा दशक्रिया विधी करत बैलगाडा मालकाने बांधली समाधी

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार आणि त्यांचे दोन मित्र गुरुद्वारा चौकात संत मोनी बाबा आश्रमाजवळ भाड्याने राहतात. ओंकार यांचे दोन मित्र बुधवारी सकाळी घराबाहेर जाताना दरवाजा उघडा ठेवून गेले. त्यानंतर अज्ञात चोरट्याने घरातून 67 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.