Alandi: गुणवत्ता स्तर निश्चिती अंतर्गत पुणे जिल्ह्यातून श्री ज्ञानेश्वर विद्यालयाला A श्रेणी प्रदान

एमपीसी न्यूज -शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असून समाजास उपयुक्त लोकशाहीप्रती निष्ठा असलेले नागरिक (Alandi)घडविण्यासाठी सर्व शिक्षण व्यवस्था कार्यरत आहे. या कार्यामध्ये निकोप स्पर्धा होऊन सातत्याने गुणवत्तेचा आलेख चढता रहावा यासाठी शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद पुणे मार्फत गुणवत्ता स्तर निश्चिती कार्यक्रम 2022 – 23 पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यान्वित करण्यात आला.
सदर स्तर निश्चिती ही उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल, (Alandi)इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा निकाल, NTS (नॅशनल टॅलेंट सर्च) परीक्षा निकाल, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, सारथी शिष्यवृत्ती, इन्स्पायर अवार्ड सहभाग व निवड, चित्रकला स्पर्धा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट), राज्य व राष्ट्रीय (कला, क्रीडा, सांस्कृतिक) स्पर्धा सहभाग या घटकावर करण्यात आली.
वरील सर्व घटकांच्या आधारावर मूल्यांकन करून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची गुणवत्ता स्तर निश्चिती मध्ये पात्र होऊन विद्यालयास *A* श्रेणी प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट कार्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण 34 शाळांना गुरुवार दिनांक 18 जानेवारी  रोजी सुमन रमेश तुलसियानी कॅम्पस, कामशेत येथे सन्मानित करण्यात आले.
यानिमित्ताने प्राचार्य दीपक मुंगसे यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आलेला सन्मान चिन्ह व पुष्प पुरस्कार संस्था व शाळेच्या वतीने स्वीकारला. उल्लेखनीय बाब म्हणजे श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सन्मानादरम्यान आयोजकांनी विद्यालयात सुरू असलेल्या ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’, ‘गणित प्रयोगशाळा’, ‘कलादालन’ आदी उपक्रमाचे कौतुक केले व विविध उपक्रमासाठी श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पाहण्याजोगे असल्याचे सांगितले.

यावेळी शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे, पुणे जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे,  गटशिक्षणाकारी राजेश गायकवाड, पंचायत समिती मावळचे सभापती गुलाब महाळसकर, उपशिक्षणाधिकारी निलेश धानापुणे, शिक्षक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 शेवटी गुणवत्ता स्तर निश्चिती मध्ये मूल्यांकनास प्राप्त सर्व शाळांचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर व संस्था पदाधिकारी यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.