Maval : बैलाचा दशक्रिया विधी करत बैलगाडा मालकाने बांधली समाधी

भावपूर्ण निरोप देताना जाधव कुटुंबाला अश्रू अनावर झाले होते

एमपीसी न्यूज – मावळ परिसरात बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा (Maval)जीव की प्राण आहे. बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहेत. मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. नुकतंच एका बैलगाडा शरतीत जिंकल्यावर खंड्या या बैलाचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याच निधन झालं.

आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या (Maval)कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शर्यत पूर्ण करून घाटाचा राजाचा मान मिळवून खंड्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्यात त्याचे निधन झाले.

Maharashtra : 54 लाख नोंदीच्या आधारे कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी शिबिरे

खंड्या बैलाला शेवटचा निरोप देताना त्यांनी रितसर दशक्रिया विधी केला. इतकंच नाही तर खंड्या या बैलाची समाधी उभारून विधीवत पूजा केली.

त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील नानोली गावात जाधव या शेतकऱ्याने त्याच्या लाडक्या बैलाचा निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी आणि उत्तरकार्य केलं आहे. बैलगाडा शर्यतीत खंड्या या बैलाने अनेक विक्रम केले तर रांजणगाव, लोहगाव , चऱ्होली , सारख्या 65 हून अधिक ठिकाणी शर्यती जिंकल्या तसेच महाराष्ट्र केसरी, घाटाचा राजा म्हणून नाव लौकिक खंड्या बैलाने मिळवला होता.

मात्र शेवटच्या क्षणी खंड्या या बैलाने घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला. या बैलाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने आपल्या घराशेजारीच लाडक्या खंड्या बैलाचा निधन झाल्यानंतर दफन विधी केली आणि त्यानंतर दहावा विधी आणि उत्तरकार्य देखील केले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

जाधव कुटुंबीयांनी 8 महिन्याचा असतांना खंड्या हा बैल अमकुश जाधव यांच्याकडून खरेदी केला होता. त्यानंतर 5 वर्ष त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला.खंड्याच्या निधनानंतर जाधव कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.