Chinchwad : घरात घुसून महिलेचा विनयभंग; एकास अटक

एमपीसी न्यूज – पाणी पिण्याच्या (Chinchwad) बहाण्याने घरात घुसून एका व्यक्तीने महिलेसोबत गैरवर्तन केले. महिलेचा विनयभंग केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1 जून) रात्री साडेआठ वाजता आणि मागील एक महिन्यापूर्वी लिंक रोड, चिंचवड येथे घडली.

मनोज मारुती सुर्वे (वय 42, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती कामावर गेले असल्याने त्या घरी एकट्या होत्या. त्या घरात एकट्या असल्याचे पाहून आरोपीपणी पिण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या घरात आला. त्याने फिर्यादींसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.

Abuse Case : वडिलांसोबत घरासमोर बोलत थांबलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन; तरुणावर गुन्हा दाखल

1 जून रोजी आरोपी रात्री साडेआठ वाजता पुन्हा फिर्यादीच्या (Chinchwad) घरी आला. फिर्यादी स्वयंपाक करत असताना त्याने फिर्यादींसोबत गैरवर्तन करत पुन्हा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.