SRA Project : ‘रेडझोन हद्दीत सर्वसामान्यांना घर बांधण्यास परवनागी नाही, मग एसआरए प्रकल्प कसा, चौकशी करा’

शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (SRA Project) हद्दीतील सेक्टर 21, त्रिवेणीनगर, कृष्णानगर परिसरात रेडझोनच्या नवीन आकारणीबाबतच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांना नव्याने घर बांधण्यास, दुरूस्तीस परवानगी मिळत नाही. तर, दुसरीकडे त्रिवेणीनगर चौकात झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पाचे काम जोरदार सुरू आहे. महापालिकेचा दुजाभाव आहे. त्यामुळे या पुर्नवसन प्रकल्पाच्या कामाला महापालिका आणि प्राधिकरणाने परवानगी कशी दिली, याची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

शिवसेनेच्या जिल्हा संघटिका उबाळे यांनी (SRA Project) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (शुक्रवारी) भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. त्यात उबाळे यांनी म्हटले आहे की, त्रिवेणीनगर चौकात महापालिका आणि प्राधिकरणाच्या परवानगीने झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आला आहे. मात्र, रेडझोनचे कारण देऊन याच परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना नव्याने घर बांधण्यास अथवा घर दुरूस्ती करण्यास परवानगी मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

PCMC Election 2022: …तर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एकला चलो रे ची’ भूमिका – अजित पवार

पुर्नवसन प्रकल्पाला एक न्याय आणि सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय असा दुजाभाव महापालिकेकडून होत आहे. यापूर्वी झालेल्या पुर्नवसन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असूनही पात्र लाभार्थी या प्रकल्पात राहण्यास जाऊ शकत नाहीत. महापालिकेने नवीन रेडझोन हद्द निश्‍चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविला आहे. मात्र, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे नवीन रेडझोनची हद्द निश्‍चित लवकरात-लवकर करण्याबाबत आदेश द्यावेत. तसेच झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पाच्या कामाला परवानगी कशी काय दिली, याची चौकशी करावी, अशी मागणी उबाळे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.