PCMC Election 2022: …तर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एकला चलो रे ची’ भूमिका – अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC Election 2022) निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस या मित्र पक्षाशी आघाडी व्हावी अशी आमची भूमिका आहे. मित्र पक्षांनी व्यावहारिक विचार करुन जागांची मागणी करावी. त्यांचा योग्य प्रस्ताव आल्यास नक्की आघाडी केली जाईल. आघाडी व्हावी हीच आमची भूमिका आहे. पण, मित्र पक्षांनी ताकदीपेक्षा जास्त मागण्या केल्यास आम्हाला ‘एकला चलो रे’ची भूमिका घ्यावी लागेल असे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले.

महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हे पक्ष एकत्र लढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. किमान समान कार्यक्रमानुसार आणि आघाडी धर्माचे पालन करत पुढे जायचे आम्ही ठरविले आहे. राज्यात, जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पाया अधिक भक्कम, व्यापक करायचा आहे. नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडायचे आहे. काँग्रेस, शिवसेनेनेही कार्यकर्ते जोडावेत, तो त्यांचा अधिकार आहे. 15 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये एकत्रित काम करत असताना आप-आपल्या स्तरावर आपला पक्ष वाढवत होतो. आता तशाच पद्धतीने काम चालू आहे.

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे 100 नगरसेवक निवडून द्या, दररोज पाणीपुरवठ्यासह सर्व प्रश्न सोडवितो

आगामी महापालिका निवडणुकीत (PCMC Election 2022) आघाडी होण्याबाबत मित्र पक्षांशी चर्चा सुरु आहे. मित्र पक्षांनी व्यावहारिक विचार करुन जागांची मागणी करावी. त्यांचा योग्य प्रस्ताव आल्यास नक्की आघाडी केली जाईल. आघाडी व्हावी हीच आमची भूमिका आहे. पण, मित्र पक्षांनी ताकदीपेक्षा जास्त मागण्या केल्यास आम्हाला एकला चलो रे ची भूमिका घ्यावी लागेल असेही पवार यांनी स्पष्ट केले.

जनता 2017 मध्ये विकासाच्या पाठिशी उभी राहिली नाही ही खंत!

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मोदी लाटेचा फटका राष्ट्रवादीला  सहन करावा लागला. पण, विकास कामाच्या पाठिशी जनता का उभी राहत नाही, कशामुळे अशा प्रकारे घटना घडतात. ही माझ्या मनात खंत होती. कार्यकर्ता पक्षाचा कणा आहे. प्रत्येकजण इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त करत आहे. त्यात काही दुमत नाही. पण, पक्षाने कोणाला एकाला उमेदवारी दिल्यास न फुगता, रुसता, विरोधी काम न करता पक्षाच्या उमेदवाराचे काम केले. तरच, फायदा होईल. तसेच महापालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादीने कोणालाही तिकीट दिले नाही. इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज करावेत. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्यासाठी जीवाचे रान करत आहोत. ओबीसींना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणार नाही, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.