Chinchwad: प्रशासनाच्या आदेशाला पायदळी तुडवणाऱ्या 563 जणांवर कारवाई

Chinchwad: Action taken against 563 people for violating administration order in lockdown नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. यामध्ये नागरिकांच्या हालचालीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि.21) 563 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. प्रसंगी पोलिसांकडून काठीचा प्रसाद देखील नागरिकांना दिला जात आहे. मात्र पोलिसांच्या या कारवाईला नागरिक जुमानत नसल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे.

नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत.

मंगळवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (79), भोसरी (14), पिंपरी (11), चिंचवड (43), निगडी (20), आळंदी (4), चाकण (45), दिघी (47), म्हाळुंगे चौकी (15), सांगवी (21), वाकड (46), हिंजवडी (28), देहूरोड (76), तळेगाव दाभाडे (31), तळेगाव एमआयडीसी (46), चिखली (25), रावेत चौकी (6), शिरगाव चौकी (6)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.