Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या लौकिकात भर; वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर

एमपीसी न्यूज – प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना विविध पदके ( Chinchwad ) जाहीर करण्यात आली. मध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले.

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील चोपडी हे मूळगाव असलेले वसंत बाबर यांनी राहुरी विद्यापीठातून एमएस्सी ॲग्री केले आहे. डिसेंबर 1996 मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात दाखल झाले. 3 जून 2014 रोजी पोलीस निरीक्षक पदावर त्यांना बढती मिळाली. मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे ग्रामीण पोलीस दलात त्यांनी आजवर कर्तव्य बजावले. सध्या ते पिंपरी -चिंचवड पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावत आहेत.

आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांनी सेवा केली आहे. सेवा कालावधीमध्ये खून प्रकरणी दाखल असलेल्या संवेदनशील आणि क्लिष्ट सहा गुन्ह्यांची बाबर यांनी उकल केली. तसेच दरोडे, जबरी चोरी, घरफोडी चोरी व इतर मालमत्तेच्या चोरीच्या क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केलेली आहे. बलात्कार प्रकरणी दाखल तीन गुन्ह्यांतील संशयितांविरुध्द उत्कृष्ट तपास करून दोषारोप दाखल केल्यानंतर सुनावणी दरम्यान संशयिताना शिक्षा झाली.

PCMC : शहरात 35 ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

नुकतेच घरफोडी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करून 18 घरफोडी चोरीतील एक किलो सोन्याचे दागिने जप्त करण्याची कामगिरी केली. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना 2024 चा गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पकद जाहीर करण्यात आले.

वसंत बाबर यांना सेवा कालावधीत आत्तापर्यंत 351 बक्षीस व 23 प्रशस्तीपत्रक प्राप्त झाले आहेत. 2014 मध्ये सेवा कालावधीतील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे ‘पोलीस महासंचालक पदक’ देऊन बाबर यांना गौरवण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते देखील बाबर यांना सन्मानित करण्यात (Chinchwad ) आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.