PCMC : शहरात 35 ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत राष्ट्रीय नागरी ( PCMC) आरोग्य अभियानांतर्गत शहरातील विविध 35 ठिकाणी “नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र”  व “हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी जागा भाडेतत्वार घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

या अनुषंगाने शहरातील विविध भागातील इच्छुक जागा मालकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नियम, अटी शर्तींची पुर्तता करून क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने बंद पाकिटामध्ये 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याबाबत शहरातील जागा मालकांना महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Pune : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील – उपमुख्यमंत्री अजित पवार

शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासुन ते झोपडपट्टी वस्ती पासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त आहे. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे, काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहेत. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापुर्ण सेवा प्रदान करण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा अरोग्य निर्देशांक वाढविण्याकरीता “नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र”  व “ हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” याद्वारे गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्यशासनाचा मानस आहे.

याबाबत सविस्तर माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिक यांनी संकेतस्थळाला भेट देऊन याबाबत माहिती घेऊ ( PCMC) शकतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.