Chinchwad : यंदा ‘पिंपरी-चिंचवड आयडॉल’ची आर्या फडतरे ठरली मानकरी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड आयडॉल मोरया करंडक 2019 या स्पर्धेची अंतिम फेरी सोमवारी पार पडली. यंदा पिंपरी-चिंचवड आयडॉल मोरया करंडकची मानकरी आर्या फडतरे ठरली. सुमारे 21 हजार रुपये रोख आणि मोरया करंडक ट्रॉफी असे पारितोषिक आर्याला देण्यात आला.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सोमवारी, (दि. 05) सायंकाळी पाच वाजता झाली. परीक्षक सुबोध चांदवडकर, प्रतिभा इनामदार, सायली सांभारे, नाट्य परिषद शिरूर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके, संयोजिका सुषमा बोऱ्हाडे व मार्गदर्शक भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेस सुरुवात केली. अंतिम फेरीत एकूण 12 स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेत तीन राउंड होते. तीनही फेऱ्यांमध्ये सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट गाणी गायली.

  • स्पर्धकांसोबतच परीक्षकांनीही गीते सादर केली. सायली सांभारे यांनी ‘कैसी पहेली है ये’… हे गाणे सादर केले तर, प्रतिभा इनामदार यांनी गाण्यांतील अनेक भाव सांगून त्यानुसार गीते सादर केली. तसेच परीक्षकांच्या आग्रहाने भाऊसाहेब भोईर यांनी ही ‘हाये रे हाये तेरा घुंगटा’ हे गीत गायले.

यंदाच्या पिंपरी-चिंचवड आयडॉल स्पर्धेमध्ये नविन उपक्रम म्हणून समाजातील दिव्यांग अशा व्यक्तींना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून संयोजिका सुषमा बोऱ्हाडे यांनी वर्षा पाडाळे व सचिन पिसाळ यांना गाणे सादर करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांनीही आपली कला सादर करून सर्वांची मने जिंकली. संपूर्ण स्पर्धेचे आयोजन हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर, संयोजन सुषमा बोऱ्हाडे, मानसी भोईर यांनी तर संगीत संयोजन मधुसूदन ओझा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.