Chinchwad : पार्ट टाईम जॉब शोधताना सावधान

एमपीसी न्यूज – घरबसल्या पार्ट टाईम जॉब शोधण्याच्या (Chinchwad) तयारीत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण, तुम्हाला काम देण्याच्या बहाण्याने अनेकजण गंडा घालण्याच्या तयारीत असतात. कामाचे स्वरूप, खासगी सुरक्षा आदींची खात्री झाल्याशिवाय वैयक्तिक माहिती देणे टाळलेलेच सुरक्षित ठरते.

घरी बसून दिवसातून तास दोन तास काम करा आणि महिन्याला हजारो रुपये कमवा. अशा प्रकारच्या जाहिराती हल्ली सर्व ठिकाणी पाहायला मिळतात. वेब डेव्हलपर, डेटा एंट्री, कन्टेन्ट रायटर, ट्रान्सलेटर, ब्लॉगिंग, व्लॉगिंग, ऑनलाईन क्लासेस अशा असंख्य क्षेत्रात ऑनलाईन पार्ट टाईम जॉब करता येतात.

अनेकजण त्यात काम करून पैसे कमावतात देखील. मात्र सायबर गुन्हेगारांनी त्यातही फसवणुकीची संधी शोधली आहे. नागरिकांशी संपर्क साधून त्यांची वैयक्तिक गोपनीय माहिती घेऊन त्या माहितीचा गैरवापर करून मोठ्या रकमांची मागणी करणे, हा त्यातला पहिला भाग आहे.

Mahalunge : मारहाण करून नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडणे. मोठी रक्कम गुंतवल्यास ऑनलाईन बाजार गुंडाळून (Chinchwad) घेत फसवणूक करणे, ही फसवणुकीची दुसरी पद्धत आहे. यामध्ये सुरुवातीला काही रक्कम परत दिली जाते. ज्यामुळे नागरिकांना आपण पैसे कमावत असल्याचा, जिंकत असल्याचा विश्वास येतो. त्यामुळे ते आणखी जास्त पैसे गुंतवण्यास उद्युक्त होतात. मोठी रक्कम मिळताच नंतर संपर्क बंद केला जातो.

पार्ट टाईम जॉबच्या फंद्यात तरुणीने गमावले पाच लाख रुपये

संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणीने घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून पार्ट टाईम जॉब शोधला. तिच्याशी एका ठिकाणाहून संपर्क करण्यात आला. त्यांनी सुरुवातीला दोन टास्क दिले. टास्क पूर्ण होताच तरुणीच्या खात्यावर पैसे जमा झाले. त्यानंतर आणखी टास्क दिले, त्याचेही पैसे तरुणीला मिळाले. त्यानंतर रकमा वाढू लागल्या. त्यासाठी अगोदर आगाऊ रक्कम घेण्याची अट होती.

परंतु, मागील दोन वेळेला पैसे खात्यावर जमा झाले असल्याने तरुणीला ते विश्वसनीय वाटत होते. संबंधितांनी आगाऊ रकमेच्या नावाखाली वेळोवेळी एकूण पाच लाख एक हजार 500 रुपये घेतले. मात्र तरुणीला परतावा न देता तिची फसवणूक करण्यात आली.

आयटी अभियंता महिलेलाही गंडा

आयटी अभियंता म्हणून काम करणाऱ्या महिलेला देखील सायबर भामट्यांनी फसवले आहे. युट्युबवर पार्ट टाईम जॉब असून त्यावरील व्हिडीओ लाईक आणि सबस्क्राईब केल्यास पैसे मिळतील, असे आमिष महिलेस दाखवण्यात आले. मात्र हे व्हिडिओ बघण्याचे काम प्रीपेड असून त्यासाठी अगोदर पैसे भरावे लागतील, पैसे भरल्यानंतर व्हिडिओ बघायचे आणि पैसे कमवायचे, अशी ही स्कीम सांगितली गेली. यात ही आयटी अभियंता महिला बळी पडली आणि तिची तब्बल 11 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.