Chinchwad : घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने आणि रोकड लंपास

एमपीसी न्यूज – तीन अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करून घरातून चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. हा प्रकार सोमवारी (दि. 13) पहाटे अडीचच्या सुमारास चिंचवड येथे उघडकीस आला.

परशुराम एकनाथ जगदाळे (वय 57, रा. एस के एफ हाउसिंग सोसायटी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदाळे यांचे घर लाॅक लावून बंद होते. तीन अनोळखी चोरट्यांनी दरवाजाचे लोक तोडून सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास घरात प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातील चार लाख तीस हजार रुपये किमतीचे 131 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.