Chinchwad Bye Election :  पहिल्या दोन तासात 3.52 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या ( Chinchwad Bye Election) पोटनिवडणुकीसाठी आज (रविवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान झाले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख 68 हजार 964 मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार 946 पुरुष तर दोन  लाख 65 हजार 974 महिला आणि तृतीयपंथी 34 मतदार आहेत. दिव्यांग 12 हजार 313,  80 वर्षांवरील मतदारांची संख्या 9 हजार 926 आहे. तसेच अनिवासी भारतीय 331, सैनिक मतदार 168 या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहेत.

 

Nigdi Crime News : मदतीचा बहाणा करत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान झाले. 13 हजार 605 पुरुष तर 6 हजार 222 महिला अशा 20 हजार 27 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.