Nigdi Crime News : मदतीचा बहाणा करत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – दाखल पोलीस केसमधून बाहेर पडण्यास (Nigdi Crime News) मदत करतो म्हणत एकाने महिलेशी  गैरवर्तन करत शिवीगाळ केली आहे. यावरून आरोपीवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2 जून 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडत होता.

रमेश दशरथ वाघदरे (वय 42 रा.खेड) असे गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचे नाव असून शनिवारी (दि.24) पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Mahalunge Crime News : संपत्तीसाठी वडील व भावाकडून मुलीला मारहाण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्यावर दाखल असलेल्या पोलीस केसमध्ये मदत करतो म्हणून आरोपीने ओळख वाढवली. पुढे त्याने व्हॉटसअपवर अश्लिल मॅसेज करण्यास सुरुवात केली. फोनकरून फिर्यादीला शरीर सुखाची मागणी केली.

तसेच माझी पोलीस ठाण्यात ओळख आहे. तुझ्यावर केस करेन तुझे स्टेटस ठेवेन अशी धमकी दिली. यावरून आरोपीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (Nigdi Crime News) दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.