Mahalunge Crime News : संपत्तीसाठी वडील व भावाकडून मुलीला मारहाण 

एमपीसी न्यूज  – आईच्या मृत्यूनंतर वडील आणि भावाने मुलीला मारहाण (Mahalunge Crime News)  करत संपत्तीच्या कागदपत्रांवर सह्या करण्याची धमकी दिली. हा प्रकार खेड तालुक्यातील सुभाषवाडी येथे  शुक्रवारी (दि.24) घडला.

अशोक संतोष सोनवणे (वय 70), गुणवंत अशोक सोनवणे (वय 37, दोघे रा. सुभाषवाडी, निघोजे. ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या पिता पुत्राची नावे आहेत. याप्रकरणी अशोक सोनवणे याच्या मुलीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad Bye Election : महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथे बजाविला मतदानाचा हक्क

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईने स्वतः खरेदी केलेली संपत्ती बक्षीस पत्राने फिर्यादी यांना दिली. तसेच एलआयसी पॉलिसीसाठी वारसदार म्हणून फिर्यादी यांचे नाव लावले. दरम्यान 16 नोव्हेंबर 2022 रोजी फिर्यादी यांच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर वडील अशोक आणि भाऊ गुणवंत हे फिर्यादी यांच्या घरासमोर आले.

एलआयसीच्या कागदपत्रांवर तसेच संपत्तीच्या कागदपत्रांवर सह्या कधी करणार, अशी धमकी देत फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला धक्काबुक्की करून फिर्यादींच्या घरातील साहित्य फेकून दिले. संपत्तीच्या कागदपत्रांवर जर फिर्यादीने सह्या केल्या नाहीत तर त्यांना जिवे मारण्याची (Mahalunge Crime News) धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.