Chinchwad Bye Election : महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथे बजाविला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी (Chinchwad Bye Election) पिंपळेसौदागर येथील  पी.के. इंटरनैशनल शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवारी) सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली.  मतदारांचे स्वागत करून मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत  510 केंद्रावर मतदान होणार आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि आपक्ष राहुल कलाटे यांच्यासह 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Chinchwad Bye Election : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सहकुटुंब बजाविला मतदानाचा हक्क

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार
विठ्ठल ऊर्फ  नाना काटे यांनी  पिंपळे सौदागर येथील  पी.के. इंटरनैशनल स्कूल (Chinchwad Bye Election) या मतदान केंद्रावर  मतदानाचा हक्क बजावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.