Chinchwad Bye-Election : अश्विनी जगताप एकतीसाव्या फेरीत आघाडीवर; भाजपची विजयाच्या दिशेने आगेकूच

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Chinchwad Bye-Election) पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची एकतीसावी फेरी पूर्ण झाली असून भाजपच्या अश्विनी जगताप या 32,545 मतांनी आघाडीवर आहेत.

त्यांना 1 लाख 21 हजार 584 मते मिळाली असून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 89 हजार एकोणचाळीस मते मिळाली आहेत. तर अजून सहा फेऱ्या बाकी आहेत. अश्विनी जगताप यांची विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे.

जगताप – 1,21,584
काटे – 89,039
कलाटे – 40,500

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.