Chinchwad Bye-Election: भाजपच्या अश्विनी जगताप विजयाच्या समिप

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Chinchwad Bye-Election) पोटनिवडणुकीतील 30 व्या फे-यांची मतमोजणी पूर्ण झाली असून भाजपच्या अश्विनी जगताप या विजयाच्या समिप पोहोचल्या असून त्यांना 1 लाख 12 हजार 113 मते मिळाली आहेत.

तर, राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 84 हजार 338 मते मिळाली आहेत. अपक्ष राहुल कलाटे यांना 38 हजार 900 मते मिळाली आहे. जगताप यांनी 27 हजार 775 मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे जगताप यांचा विजय निश्चित झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.