Chinchwad Bye Election: ‘मविआ’तील बंडखोरीचा फायदा झाला – अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bye Election) महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बंडखोरीचा मला फायदा झाला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा मला नक्कीच फायदा झाल्याची भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी दिली.

विजयच्या समीप पोहोचल्यानंतर जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ही निवडणूक खूप महत्त्वाची होती. गड आला पण सिंह गेला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप साहेब गेले. पण, त्यांचा गड आलेला आहे.

जनतेने हा गड राखलेला आहे. विजयाची ही नांदी सगळ्यांनी नोंदवली आहे. माझा या निवडणुकी संदर्भात पहिल्यापासून आत्मविश्वास होता. लक्ष्मण जगताप साहेबांना हा विजय मी समर्पित करीत आहे. सर्वसामान्यांचे आमदार म्हणून मी काम करत राहील.

Chinchwad Bye-Election: भाजपच्या अश्विनी जगताप विजयाच्या समिप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.