Chinchwad Bye-Election : अश्विनी जगताप 36,168 मतांनी विजयी; नाना काटे यांचा पराभव

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे वर्चस्व कायम ठेवत (Chinchwad Bye-Election) एवढ्या मतांनी अश्विनी जगताप विजयी झाल्या. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होती. अश्विनी जगताप यांनी बाजी मारत महाविकास आघाडीचे नाना काटे यांचा 36 हजार 168 एवढ्या मतांनी पराभव केला. 

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला पण, चिंचवडची जागा राखण्यात भाजपला यश आले आहे. यामध्ये अश्विनी जगताप यांना 1,35,603 एवढी मते मिळाली असून नाना काटे यांना 99,435 एवढी मते मिळाली. तर, यामध्ये चर्चेत असणारे उमेदवार राहुल कलाटे यांनाही 44,112 इतकी मते मिळून पराभव पत्कारवा लागला.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने पिंपरी चिंचवड शहराचे मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. परंतु, आता अश्विनी जगताप यांच्या विजयाने पुन्हा एकदा नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Kasaba : वापरा आणि सोडून द्या या नितीमुळे भाजपचा पराभव – उद्धव ठाकरे

“मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी विजयानंतर दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.