Chinchwad Bye-Election : सांगवी, पिंपळेगुरवमध्ये नाना काटे यांची पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Chinchwad Bye-Election) अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी बुधवारी (दि. 15) नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतली. पदयात्रांमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला.

विद्यानगर, कृष्णा चौक येथे सभा घेण्यात आली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज सागर परदेशी जनसंपर्क कार्यालायपासून साई चौक, साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त नवनाथ जगताप यांची भेट, सांगवीचा राजा म्हसोबा मंदिर, फेमस चौक, नवी सांगवी नवसाचा गणपती एम के चौक, शिवनेरी चौक, कृष्णा चौक, साईराज रेसिडेन्सी, बारामती मित्र मंडळ आदी ठिकाणी नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

नाना काटे यांच्यासोबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व आरपीआयसह (गवई गट) इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.

नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. सदर यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसामिळाला. पिंपळे गुरव परिसरातील प्रत्येक मतदार आणि घरापर्यंत पोहोचत या पदयात्रेद्वारे काटे यांनी मतदारांना अभिवादन करून मतदान करण्याचे आवाहन केले.

Bye-Election: पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी; औद्योगिक आस्थापनांना निर्देश

पदयात्रेत महाविकास आघाडी (Chinchwad Bye-Election) प्रचार प्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, सामाजिक कार्यकर्ते सागर परदेशी, तानाजी जवळकर, शाम जगताप, राजू लोखंडे, अरुण पवार, सौरभ शिंदे, प्रशांत सपकाळ, प्रशांत देवकाते, पवन साळुंखे, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब पिल्लेवार, सतीश चोरमुले, राष्ट्रवादी उद्योग आणि व्यापार शहर अध्यक्ष मोनिका जाधव, ऍड श्वेता इंगळे, पिंटू निंबाळकर, साईराज रेसिडेन्सी सोसायटी सभासद, महिला वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.