Hinjawadi News: आमिष दाखवून महिलेला 20 लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज – तुमच्यासाठी चांगल्या ऑफर (Hinjawadi News) असून प्रत्येक दिवशी पाच ते आठ हजार मिळण्याचे आमिष दाखवून टेलीग्राम मॅसेंजरद्वारे मॅसेज करून वेगवेगळे टास्क दिले आणि देऊन वेगवेगळ्या पाच युपीआय आयडीच्या खात्यावर 20 लाख 15 हजार रूपये पाठवण्यास भाग पाडून महिलेची फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला.

दोन महिलांसह नवाज सीपी, सोंधी, गंगनसेन, खान अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला आरोपीने फिर्यादी महिलेला व्हॉटसअ‍ॅपवरून झेल्थ डिजीटल एजन्सी, इंडीयन ग्लोबल मिडीयामधून बोलत असल्याचे सांगितले.

तुमच्यासाठी चांगल्या ऑफर असून तुम्ही इच्छूक आहात का, असे सांगून प्रत्येक दिवशी पाच ते आठ हजार रूपये मिळतील, असे आमिष दाखवले. त्यानंतर गुगल मॅपवर ब्य्रुजरेस्टॉरंटचा शोध घेऊन स्क्रीन शॉटवरील नंबर पाठवण्यास सांगितले. त्यावर माहिती सबमीट करायला लावले.

Chinchwad Bye-Election : सांगवी, पिंपळेगुरवमध्ये नाना काटे यांची पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी

टेलीग्राम मॅसेंजरद्वारे मॅसेज करून वेगवेगळे टास्क दिले आणि देऊन वेगवेगळ्या (Hinjawadi News) पाच युपीआय आयडीच्या खात्यावर 20 लाख 15 हजार रूपये पाठवण्यास भाग पाडले आणि फसवणूक केली. फौजदार खडके तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.