Chinchwad Bye-Election : पायाखालची वाळू घसरल्याने राहुल कलाटे यांच्याकडून खोटा प्रचार – विशाल वाकडकर

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bye-Election) अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते खोटा प्रचार करीत आहेत. राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची छायाचित्रे स्वत:सोबत प्रसिद्ध करून त्यांना आपल्यासोबत जोडण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे माजी शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी लगावला आहे.

वाकडकर यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करून राहूल कलाटे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. सन 2019 साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुरस्कृत केले होते.

त्यामुळे त्यांना गेल्या निवडणुकीत 1 लाख 12 हजार मते मिळाली. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. त्यावेळी युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून (Chinchwad Bye-Election) मी देखील त्यांचा प्रचार केला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संपूर्ण प्रचार यंत्रणाना त्यांना आयती मिळाली होती.

Hinjawadi News: आमिष दाखवून महिलेला 20 लाखाचा गंडा

सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी बंडखोरी केल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह मतदारांनीही त्यांना नाकारले आहे. त्यांच्या प्रचारात सध्या कोणीही सहभागी होत नसल्याने ते विचलित व निरुस्ताही झाले आहेत. त्यांच्या प्रचाराकडे कोणीच फिरकत नसल्याने नागरिकांमध्ये दिशाभूल करणे, खोटा प्रचार करणे व इतर पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचे भासवून मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.