Pune Bye-Election : कसबा जागेसाठी भाजपचा किंगमेकर अखेर ऑक्सीजन लावून मैदानात!

एमपीसी न्यूज : भाजपसाठी शर्थीची असलेली (Pune Bye-Election) कसबा आणि चिंचवड निवडणूक. कारण भाजपचे दोन्ही हरहुन्नरी कार्यकर्ते अचानक गेल्याने दोन्ही जागा पुन्हा आपल्या ताब्यात मिळवणे हे भाजपापुढे मोठे आव्हान आहे. कारण पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीच्या अधिकतर वर्चस्वाखाली आहे. त्यात कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आणि भाजप नेते गिरीश बापट हे किंगमेकर. काल प्रचारतून माघार घेतलेले गिरीश बापट तोंडाला ऑक्सीजन लावून पुन्हा मैदानात प्रचारासाठी सिद्ध झाले आहेत. 

गेले काही महीने गिरीश बापट देखील आजारपणाला सामोरे जात आहेत. बरेच वर्ष कसबा जागेवर त्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे त्यांनी प्रचार करणे भाजपासाठी महत्त्वपूर्ण होते. परंतु, सततच्या डायलिसिस उपचारांमुळे त्यांना डॉक्टरने बाहेर पडण्यासाठी मनाई केली होती.

त्यामुळे त्यांनी प्रचारात सहभागी न होण्याचे कळवले होते. तर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांची भेट घेतल्याने आज गिरीश बापट थेट ऑक्सीजन ट्यूब लावून प्रचार सभेत सर्वांना दिसून आले. त्यामुळे भाजपचा (Pune Bye-Election) किंगमेकर पुन्हा मैदानात उतरल्याने आता कसबा जागेवर भाजपचा विजय पक्का होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.