Kalewade News : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन बँकांना गंडवले

एमपीसी न्यूज – एका बँकेचे 40 लाखाचे कर्ज असताना (Kalewade News) तशीच बनावट कागदपत्रे तयार करून ती खोटी कागदपत्रे कर्ज मंजुरीसाठी सादर करून 40 लाखाचे कर्ज घेतले. मात्र, बँकांच्या कर्जाची परतफेड न करता फसवणूक केली. हा प्रकार 11 डिसेंबर 2014 पासून काळेवाडी – विजयनगर येथे घडला.

महेश सुभाष गाते (वय 39, रा. विनोदे वस्ती, वाकड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. महेंद्र बाबुराव आवटे (वय 42, रा. आनंदवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Bye-Election : कसबा जागेसाठी भाजपचा किंगमेकर अखेर ऑक्सीजन लावून मैदानात!

फिर्यादी आवटे हे लाला अर्बन बँकेचे काळेवाडी शाखेचे अधिकारी आहेत. आरोपी गाते याने वाकड येथील सिद्धी निसर्ग सोसायटीतील एका फ्लॅटवर अ‍ॅक्सिस बँकेचे 40 लाखाचे कर्ज काढले. तशीच बनावट (Kalewade News) कागदपत्रे तयार करून खोटी कागदपत्रे कर्जमंजुरीसाठी काळेवाडी येथील लाला अर्बन सहकारी बँकेच्या शाखेत सादर केली.

लाला अर्बन बँकेकडूनही 40 लाखाचे कर्ज घेतले. दोन्ही बँकातील कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे अ‍ॅक्सिस बँकेने त्यांच्या फ्लॅटचा यापूर्वीच ताबा घेतल्याचे निष्पन्न झाले. लाला अर्बन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गाते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.