Chinchwad : भारतीय वायुसेना दिन व दिवाईन कल्चर फेस्टिवल साजरा

एमपीसी न्यूज – 8 ऑक्टोबरला येणाऱ्या (Chinchwad) भारतीय वायुसेना दिनानिमित्त एलप्रो मॉल ऑडिटोरियम पिंपरी चिंचवडमध्ये डिफेंस फोर्स लीग व डीएलएफ क्रिपटो टेक्नॉलॉजी तर्फे कल्चर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परमवीरचक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या महोत्सवात 6 विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, चित्रकला, फॅशन शो व डिवाईन जूनियर मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. भारतीय सैन्याचे प्रश्न संहित अनोख्या ब्युटि कोंटेस्टमध्ये विद्यार्थिनींनी शूरवीरांना नमन केले.

वायुसेनेचे दिग्गज एयर कोमोडोर सुरेन्द्र त्यागी (वायुसेना मेडल), ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई (विरचक्र) यांच्यासमवेत एलप्रो मॉलचे चेअरमन दीपक शर्मा, प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटीचे डॉ. नंदकिशोर एकबोटे, डॉ तनप्रीत कौर मेहता, नीलेश नेवाळे, कर्नल प्रशांत काकडे, एयर वेटेरन्स असोसिएशनचे शरदचंद्र फाटक, संजीव जावळे, माजी सुबेदार झगडे, कर्नल एल एम साठे ग्रीन थंब फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्ट, बालाजी यूनिवर्सिटी पुणे, डॉ.डि.वाय पाटील आर्ट्स कॉलेज पिंपरी, OCA चे डॉ. अमित कुमार दुबे, लक्ष अकॅडेमी, ADCI व इतर संस्थांना “परमवीरचक्र सुभेदार मेजर संजय कुमार प्राइड अवॉर्ड” देण्यात आला.

Dapodi : सोसायटीच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कामात अडथळा केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

कार्यक्रमात APML चे संस्थापक रमेश अग्रवाल समवेत भारतीय वायुसेनेच्या वीरांना आणि शालेय संस्थांना हिंदुस्तान प्राइड (Chinchwad) अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात ऑफिसर करियर अकॅडेमी च्या कडेट्स ने एयर फोर्स ड्रिल सादर केले, राईफल अॅक्ट बघून प्रेक्षक रोमांचित झाले होते.

परमवीरचक्र सुबेदार मेजर संजय कुमार विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की “दिल मे हिंदुस्तान हो तो कही भी जाओ देशभक्ती का काम करोगे”. पुणे जिल्ह्यातील शालेय संस्था व अकॅडेमी राष्ट्रहितास प्राधान्य देतात असे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे आयोजन DFL टेक्नॉलॉजी व डिफेंस फोर्स लीगचे नरेश गोल्ला, रघुनाथ सावंत, यशवंत महाडीक, राजेंद्र जाधव, सिददाराम बिराजदार, अजय खोमणे, दृष्टी जैन, सुनील वडमारे, मुजीब खान, संदीप कांबळे, ऋषिकेश जाधव, दीपक मेंघाणी, शरदचंद्र फाटक, रोहित अग्रवाल, निर्वाण गोल्ला, राज गोल्ला, विनोद शिंदे यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.