Chinchwad : चिंचवडला गणेश मंडळानी देखाव्यातून दिला सामाजिक संदेश

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील गणेश मंडळानी यावर्षी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सार्वजनिक मंडळानी हलते देखावे, जिवंत देखावे तसेच फलकांच्या माध्यमांतून सामाजिकतेचा संदेश देत जनजागृती केली आहे.

चिंचवडमधील नवतरुण मंडळाने यंदा गंगावतरण हा पौराणिक देखावा सादर केला आहे. मंडळाचे 65 वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष अनुराग चिंचवडे आहेत. तर कार्याध्यक्ष महेश चिंचवडे आहेत.

अखिल मंडई मित्र मंडळाने माणुसकीचे शिल्पकार हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे 29 वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष अतुल पडवळ आहे. चिंचवडमधील एसकेएफ गणेश मंडळाने ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ हा जीवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे 48 वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष हेमंत गाडे असून उपाध्यक्ष नाथा चव्हाण तर कार्याध्यक्ष मच्छिंद्र भोईर, सचिव मयूर चव्हाण आहेत.

गांधीपेठ तालीम मित्र मंडळाने नरसिंह अवतार हा देखावा उभारला आहे. मंडळाचे 40 वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे आहेत. तर उत्सवप्रमुख अनुप ठाकूर व विपुल नेवाळे आहेत. उपाध्यक्ष नंदू वर्मा तर कार्याध्यक्ष गजानन चिंचवडे आहेत. श्रीसंत ज्ञानेश्वर मित्र मंडळाने यावर्षी शिवभक्त हा देखावा उभारला आहे. मंडळाचे हे 68 वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ शेलार असून उपाध्यक्ष शुभम ढवळे तर कार्याध्यक्ष बंटी तिकोणे आहेत. उत्कृष्ट तरुण मंडळाने स्वामी समर्थाचा साक्षात्कार हा हलता देखावा उभारला आहे. मंडळाचे हे 37 वे वर्ष असून नागेश आगज्ञान हे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी तर कार्याध्यक्ष प्रशांत आगाज्ञान तर सचिव दत्तात्रय मोरे आहेत.

      

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.