Chinchwad: कोरोनामुक्त झालेल्या दाम्पत्यांचे फुलांचा वर्षाव, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

एमपीसी न्यूज – कोरोनामुक्त झालेल्या चिंचवड, संभाजीनगर येथील दाम्पत्यांचे नागरिकांनी फुलांचा वर्षाव ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. औक्षण करून परिसरातील नागरिकांनी आज (गुरुवारी) दोघांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

संभाजीनगर परिसरात हे दाम्पत्य वास्तव्याला आहे. महिला नर्स आहे. पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात नोकरी करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नर्स काही दिवसांपासून रुग्णालयातच वास्तव्याला असताना या नर्सचे 15 एप्रिल रोजी कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यांनतर महिलेच्या पतीचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

दोघांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. 14 दिवसांचे उपचार घेऊन दोघे कोरोनामुक्त झाले आहेत. 14 दिवसांचे आणि त्यांनंतरचे 24 तासाचे दोनही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दोघेही कोरोनामुक्त झाले असून आज त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनामुक्त होत घरी आलेल्या या दाम्पत्यांचे संभाजीनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. फुलांचा वर्षाव, ढोल ताशाचा गजर करत आणि औक्षण करत नागरिकांनी स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.