Dehuroad : विवाहितेच्या छळप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पहिल्या दोन लग्नांची माहिती लपवून ठेवून तिसरा विवाह केला. विवाहानंतर तिसऱ्या पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिचा छळ केला. यामध्ये आरोपी पतीची दुसरी पत्नी देखील सहभागी होती. हा प्रकार देहूगाव येथे घडला. पोलिसांनी पती, त्याची दुसरी पत्नी आणि त्याची आई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिलेचा पती, सासू आणि त्याची दुसरी बायको यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी महिलेच्या पतीची पहिली दोन लग्न झालेली माहिती फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवली. तसेच दुसऱ्या पत्नीसोबत फारकत झालेली नसतानाही खोटी बंधपत्रे दाखवून फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर आरोपी पतीने दुस-या पत्नीसोबत पुन्हा संबंध ठेवले.

त्यानंतर पीडित विवाहितेला घरातून जाण्यासाठी मारहाण केली. ‘तुझ्यासोबत राहायचे नाही’ असे म्हणत पीडित विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. आरोपी पतीच्या दुसऱ्या पत्नीने देखील पीडित विवाहितेला वारंवार फोन करून शिवीगाळ केली. ‘आमच्या दोघांच्या मध्ये आलीस तर तुला बघून घेईल’ अशी धमकी देखील दुसऱ्या पत्नीने दिली.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.