Chinchwad Crime : अनधिकृत बांधकाम प्रकरणी प्राधिकरणाकडून चार गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी प्राधिकरणाकडून चिंचवड पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

चारही प्रकरणांमध्ये प्राधिकरणाच्या सहाय्यक अभियंता एस एस भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे. पहिल्या प्रकरणात नागेंद्र गणपत गवळी आणि गणपत गवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी चिंचवड मधील पेठ क्रमांक 31 येथे प्राधिकरणाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले आहे.

दुस-या प्रकरणात विष्णू पांडुरंग कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम याने चिंतामणी कॉलनी, आहेर नगर, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे प्राधिकरणाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले आहे.

तिस-या प्रकरणात अलका तुकाराम भोसले आणि नरेंद्र तुकाराम भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मातोश्री कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे प्राधिकरणाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले आहे.

चौथ्या प्रकरणात हेमराज देवनदास थावानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थावानी याने गुरुद्वारा चौकाजवळ वाल्हेकरवाडी येथे प्राधिकरणाच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले आहे. चारही प्रकरणात एमआरटीपी कायदा कलम 53 (1) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.